दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
🤓 एकनाथ शिंदे यांना हटवले, अजय चौधरी शिवसेने नवे गटनेते :
राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी अपडेट आली आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आल्याचं कळतं आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतृत्वाने मोठा धक्का दिला आहे.
🗣️ बंडानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया :
शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही असे शिंदे यांनी म्हटले. दरम्यान, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
💁♂️ एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया :
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत पहिली प्रतिक्रिया देताना या प्रश्नावर चर्चेमधून तोडगा निघू शकतं असं म्हटलं आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असून एकनाथ शिंदेंचा प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून त्यांच्याकडून आमच्याशी संपर्क साधण्यास असल्यास चर्चा करु.
😊 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी :
केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी नुकतीच पाहायला मिळत आहे. कारण येत्या काळात सरकार फिटमेंट फॅक्टरसंदर्भात मोठा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळं शासकीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होणार आहे. यासाठी एक मसुदा तयार करण्यात येणार असून, तो शासनाकडे सोपवण्यातही येणार आहे. मसुदा तयार करण्यात आल्यानंतर जुलै महिन्यात यासंदर्भातील बैठक होणार आहे. सदर प्रकरणी केंद्रानं सहमती दर्शवल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात फिटमेंट फॅक्टर अंतर्गत वाढ होणार आहे.
🧘♂️ योग दिनानिमित्त पंतप्रधानांचं कर्नाटकात योगासन :
आज, जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस मैदानावर योग कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग कार्यक्रम म्हैसूर पॅलेस मैदानावर सकाळी 6.30 वाजता सुरू झाला. या दरम्यान पंतप्रधान मोदी योगा करताना दिसले.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment