📌 *दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी*
*(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर )*
❗ *शिंदे यांच्यासह 16 जणांना अपात्रतेची नोटीस* :
पक्षादेश बजावूनही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल शिवसेनेने केलेल्या अर्जानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस बजाविली आहे. या सर्वाना सोमवारी सायंकाळपर्यंत उत्तर देण्यास मुदत देण्यात आली आहे. या नोटिशीमुळे शिवसेना व शिंदे गटात आता कायदेशीर लढाईला प्रारंभ झाला.
🗣️ *“तुमच्यात हिंमत असेल तर…!”* :
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना खुलं आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, “तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावाल, त्यांचे भक्त आहोत असं म्हणाल. पण बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर नाही खुपसणार. जे व्हायचंय ते होऊ द्या. जे करायचंय ते करा. मुंबईत तर यावं लागले ना? कोण काय करतंय त्यानं काही फरक पडत नाही”, असंही राऊत म्हणाले.
👀 *ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ झळकला पहिला बॅनर*
राज्यासह ठाण्यामध्ये राजकीय वातावरण ढवळलं आहे. ठाण्यात सर्वत्र एकनाथ शिंदे समर्थक यांच्याकडून बंडाच्या पहिल्या दिवसापासून बॅनरबाजी करून मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत असल्याचे बॅनर उभा राहताहेत. हे घडत असतानाच आज ठाण्यात एक बॅनर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ देखील लावलेला दिसून आला आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात लावलेला हा पहिला बॅनर असल्याचं समजतंय.
🏥 *राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना रुग्णालयातून डिस्चार्ज* :
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांची प्रकृती आता बरी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. करोनाची लागण झाल्यामुळे कोश्यारी यांना मुंबईतील रिलाईन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राजभवनात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
🏏 *टीम इंडियाच्या अडचणीत वाढ; रोहित शर्माला कोरोनाची लागण* :
भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला आणि एकमेव कसोटी सामना 1 जुलैला होणार असून याआधी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्यांच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीबीसीसीआयने ट्विट करत याची माहिती दिली आहे. रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून ला जॉईन व्हा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* - 9049195786
No comments:
Post a Comment