*अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन*
*नाशिक,दि.२६ जून*:- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज नाशिक येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जात आहे. आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, योगेश निसाळ, राजेंद्र जगझाप, मकरंद सोमवंशी, समाधान तिवडे, ज्ञानेश्वर महाजन, श्रीराम मंडळ, दिपक गांगुर्डे, संकेत निमसे, भालचंद्र भुजबळ, संतोष पुंड, उदय सराफ, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment