दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
😊 दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजताऑनलाईन जाहीर होईल.
😎 शिवसेना-भाजपचे आता हॉटेल पॉलिटिक्स सुरू :
विधान परिषदेतील दगा फटका टाळण्यासाठी शिवसेना-भाजपचे आता हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले आहे. 18 जूनपासून मुंबईत मुक्कामाला दाखल व्हा, असे आदेश शिवसेना आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, तर भाजपने देखील तोच कित्ता गिरवला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
📣 इंडिया पोस्ट GDS चा निकाल जाहीर :
भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) चे निकाल प्रसिद्ध केले आहेत. इंडिया पोस्टची निवड यादी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या प्रदेशांमधून GDS अर्ज सादर केला आहे ते त्यांचे निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात. या निवड यादीत सहभागी झालेल्या उमेदवारांना आता कागदपत्र पडताळणी फेरीसाठी हजर राहावे लागेल.
🔥 'अग्निपथ' योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला :
लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. बुधवारी बिहारमध्ये या योजनेविरोधातील आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आज अनेक जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आज हरयाणातील गुरुग्राममध्येही आंदोलन झाले. आंदोलक विद्यार्थी-युवकांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केले आहे. तर, बिहारमधील आंदोलनाला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
🔎 राहुल गांधींना आज दिलासा, उद्या पुन्हा चौकशी :
नॅशनल हेराल्डप्रकरणी आता राहुल गांधी यांची शुक्रवारी चौकशी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना आतापर्यंत केवळ 50% प्रश्न विचारण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांना ईडी कार्यालयात बोलावणे सुरूच राहील. एकीकडे ईडीचे अधिकारी त्यांच्या उत्तरांवर असमाधानी दिसले, तर दुसरीकडे, राहुल गांधींना असेही म्हणावे लागले की, आता त्यांना दररोज येथे यावे लागेल, कारण चौकशी बराच काळ चालणार आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment