कोरोना : महाराष्ट्रात पुन्हा भीतीदायक आकडेवारी; सर्वाधिक रुग्ण मुंबईत - latur saptrang

Breaking

Sunday, June 5, 2022

कोरोना : महाराष्ट्रात पुन्हा भीतीदायक आकडेवारी; सर्वाधिक रुग्ण मुंबईत

 


कोरोना : महाराष्ट्रात पुन्हा भीतीदायक आकडेवारी; सर्वाधिक रुग्ण मुंबईत


कोरोना (Corona) विषाणूचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. दररोज कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन प्रकरणे (patient) वाढत आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या वेगात मंकीपॉक्सनेही तणाव वाढवला आहे. (Coronas scary statistics again in Maharashtra) 

देशभरात कोरोना संसर्गाचे ४,२७० नवे रुग्ण आढळले असताना एकट्या महाराष्ट्रातून १,३५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. एक दिवसापूर्वी देखील कोरोनाचे १,१३४ नवीन रुग्ण आढळून आले होते आणि तिघांचा मृत्यू झाला होता. राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा (patient) आकडा ५,८८८ वर पोहोचला आहे. राज्य सरकारने कोरोना नियंत्रणासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.महाराष्ट्र सरकारचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. लोकांनी सभागृहात, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मास्क वापरावे. मास्कच्या वापरावर सरकार कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ७८ लाख ९१ हजार ७०३ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ८६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत

कोरोनाच्या (Corona) नवीन रुग्णांच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात मुंबईतून (Mumbai) सर्वाधिक रुग्ण (patient) आढळले आहेत. ४ मे रोजी मुंबईत ८८९ नवीन रुग्ण आढळले. याच्या एक दिवस आधी मुंबईत ७६३ नवीन रुग्ण आढळले होते. मुंबईत कोरोनाचे ४,२९४ सक्रिय रुग्ण आहेत. शहरात आतापर्यंत कोरोनाचे एकूण १० लाख ६८ हजार ८९७ रुग्ण आढळले आहेत.

मंकीपॉक्सबद्दल तणाव

कोरोना (Corona) महामारीच्या काळात मंकीपॉक्सनेही चिंता वाढवली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पाच वर्षांच्या मुलीमध्ये मंकीपॉक्ससारखी लक्षणे आढळून आली. या मुलीचे नमुने घेतल्यानंतर आरोग्य विभागाने ते खबरदारीच्या तपासणीसाठी पाठवले आहेत. कोरोनाच्या साथीच्या काळात या संशयास्पद प्रकरणामुळे तणावही वाढला आहे.

No comments:

Post a Comment