महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर - latur saptrang

Breaking

Friday, June 24, 2022

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक या विभागांमध्ये आयोगातर्फे जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणी अनुषंगाने आयोगाने विविध विभागांसाठी वेगवेगळ्या तारखा व वेळा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार  संबधित जाती/जमातींनी ठरवून दिलेल्या तारखांना उपस्थित राहावे, असे आवाहन आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पुणे विभागाची सुनावणी दि. 30 जून रोजी व्ही.व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृह, पुणे येथे दु. 2.00 वा. होणार असून सुनावणीस सगर, कडिया, कुलवाडी, टकारी, लिंगायत रड्डी या जाती/जमातींनी त्यांनी उपस्थित रहावे.

अमरावती विभागाची सुनावणी दि. 5 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, अमरावती येथे सकाळी 11.00 वा. होणार आहे. या सुनावणीस हलवाई, हलबा कोष्टी, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार, हडगर, केवट समाजातील तागवाले/ तागवाली यांनी उपस्थित रहावे, तसेच तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करण्याबाबतही सुनावणी होणार असून संबंधित जाती/जमातींनी या दिवशी वरील वेळी सुनावणीस उपस्थिती रहावे.

नाशिक विभागाची सुनावणी दि. 15 व दि. 16 जुलै, 2022 अशी दोन दिवस होणार आहे. दि. 15 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक येथे सकाळी 11.00 वा. होणाऱ्या सुनावणीस काथार / कंठहारवाणी, कंसारा, अत्तार जातीय तत्सम जातः पटवे, पटवेगर, पटोदर, चेवले गवळी दाभोळी, गवळी व लिंगायत गवळी, नावाडी या जाती / जमातींनी उपस्थित रहावे, तसेच बैरागी जातीच्या संदर्भात शासन निर्णयात दुरुस्तीच्या अनुषंगाने या सुनावणीस उपस्थिती रहावे.

दि. 16 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक येथे सकाळी 11.00 वा. होणाऱ्या सुनावणीस वळंजूवाणी, कुंकारी वळांजूवाणी, वळुंज बळुंज, शेटे, दलाल इ., लाडशाखीय वाणी, लाडवंजारी, रामगडिया सिख, कानडे / कानडी या जाती / जमातींनी उपस्थित रहावे, असे संशोधन अधिकारी, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/UIo6dnQ
https://ift.tt/anBX5sd

No comments:

Post a Comment