सरकारचं काय होणार? पवार-ठाकरेंमध्ये 'मातोश्री'वर दोन तास खलबतं - latur saptrang

Breaking

Friday, June 24, 2022

सरकारचं काय होणार? पवार-ठाकरेंमध्ये 'मातोश्री'वर दोन तास खलबतं

 


सरकारचं काय होणार? पवार-ठाकरेंमध्ये 'मातोश्री'वर दोन तास खलबतं


मुंबई : एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. यादरम्यान शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच एक बैठक पर पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील हे नेते देखील उपस्थित होते. तब्बल दोन तासांच्या बैठकीनंतर शरद पवार मुख्यमंत्र्याचे निवासस्थान मातोश्रीबाहेर पडले.

दरम्यान या नेत्यांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल राजकीय वर्तुळात तर्क लावले जात आहेत. शरद पवार महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी कोणती खेळी खेळतील आणि उद्धव ठाकरेंना काय सल्ला देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मविआच्या नेत्यांसोबत झालेल्या या महत्वपुर्ण बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या खासदारांसोबत देखील बैठक घेणार आहेत.

मात्र शरद पवारांसोबत झालेल्या या बैठकीत शिवसेनेच्या पाठीमागे उभं राहण्याची रणनीती स्विकारल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आता रस्त्यावरील लढाईला सुरूवात करेल ज्यामध्ये राष्ट्रवादी देखील शिवसेनेसोबत असणार असल्याची चर्चा आहे.

तसेच मविआकडून १६ बंडखोर आमदारांचं निलंबन करण्यासाठीची रणनीती या ठरवण्यात आली. ही प्रक्रिया कशी पूर्ण करावी याबद्दल देखील नेत्यांनी या बैठकीत निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. हे बंड जितके दिवस चालेल तेवढा एकनाथ शिंदे गटावर दबाव वाढणार आहे, हा दबाव आणखी वाढवण्यासाठी सरकारकडून आमदारांच्या निलंबनासाठी प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान महाविकास आघाडीकडून या बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी देखील यापुढे प्रयत्न करण्यात येतील.

No comments:

Post a Comment