दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
💰 केंद्र सरकारचा नोकरदारांना मोठा धक्का! :
केंद्र सरकारने देशभरातील नोकरदार वर्गाला मोठा धक्का दिला आहे. कारण सरकारने 2021-22 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर 8.1 टक्के व्याजदर मंजूर केला आहे. ईपीएफओ कार्यालयाने याबाबत माहिती दिली. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच ग्राहकांच्या खात्यात व्याज जमा केले जाते. मार्च महिन्यात ईएफपीओने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ते 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणले होते. असे सांगितले जात आहे की, पीएफवरील व्याजदर अद्याप कमी आहे. त्यामुळे डिसेंबरपूर्वीच ते जमा केले जाऊ शकते.
💁♂️ 'पेट्रोल डिझेलची जागा ग्रीन हायड्रोजन घेणार' :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल डिझेल संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. गडकरी यांनी पुण्यातील साखर परिषदेत बोलताना म्हटलं आहे की, पेट्रोल डिझेल संपणार. त्याची जागा ग्रीन हायड्रोजन घेणार आहे. पाणी आणि बायो मासपासून ग्रीन हायड्रोजन तयार होतो. प्रत्येक साखर कारखान्यात ग्रीन हायड्रोजन तयार झाला तर साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पादन मिळेल, असं गडकरी म्हणाले.
📍 पंजाब अँड सिंध बँकेला झटका :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पंजाब आणि सिंध बँकेला 27 लाख रुपयांपेक्षा अधिक दंड ठोठावला आहे. बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड सिंध बँकेला हा दंड ठोठावला. पंजाब अँड सिंध बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर देण्यात आलेले उत्तर समाधानकारक नव्हतं आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे बँकेला 27.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
😎 संजय राऊतांची भाजपवर खोचक टीका :
राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकेल. सहावी जागेवर देखील महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होऊन राज्यसभेवर जाईल. भाजपने उगीचच पैसा वाया घालवू नये, पैसे असतील तर सामजिक कार्यासाठी वापरावे, अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपवर केले आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
🗣️ यंदा विक्रमी साखर निर्यातीची संधी - शरद पवार :
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेचे उद्घाटन झालं. यावेळी शरद पवारांनी म्हटलं की, यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात आहे. पण यात आनंद न मानता पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करावी लागेल. तज्ञांच्या अंदाजानुसार यावर्षीपेक्षा पुढील वर्षी उसाचे लागवड क्षेत्र आणखी वाढेल. त्यामुळे उसाच्या तोडणीचे नियोजन लागवड पासून करावे लागेल, असं पवार म्हणाले.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून latursaptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment