मुंबईत राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात ६ जून रोजी ‘शिवस्वराज्य दिन’ - latur saptrang

Breaking

Saturday, June 4, 2022

मुंबईत राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात ६ जून रोजी ‘शिवस्वराज्य दिन’

मुंबई, दि. 4 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या शिवस्वराज्यभिषेक दिनी स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन साजरा करावा, अशा शासनाच्या सूचना आहेत.

या दिनाचे औचित्य साधून सोमवार, 6 जून 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, फोर्ट, मुंबई येथे हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष प्रताप आसबे, साहित्यिक अरुण म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या नियोजित कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित  राहावे, असे आवाहन प्र.ग्रंथालय संचालक शालिनी इंगळे यांनी केले आहे.

000

 

संजय ओरके/विसंअ



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Kts61SH
https://ift.tt/uLUz4W8

No comments:

Post a Comment