देशहितासाठी प्राणाची आहूती देणार्‍या शहीद वीर भगतसिंगाच्या एलईडी बोर्डला विरोध कशासाठी? - latur saptrang

Breaking

Friday, June 24, 2022

देशहितासाठी प्राणाची आहूती देणार्‍या शहीद वीर भगतसिंगाच्या एलईडी बोर्डला विरोध कशासाठी?



 देशहितासाठी प्राणाची आहूती देणार्‍या शहीद वीर

भगतसिंगाच्या एलईडी बोर्डला विरोध कशासाठी?
अजितसिंह पाटील कव्हेकरांचा पालकमंत्र्यांना सवाल
लातूर दि.22-06-2022
शहीर वीर भगतसिंग चौक नावाचा एलईडी फलक लोकसहभागातून बसविण्याची परवानगी अकाल सेनेच्यावतीने घेण्यात आली. त्या एलईडी फलकाचे काम काही तरूणांनी स्वखर्चातून पूर्ण केले. त्यासाठी साधारणपणे सात लाखापर्यंतचा खर्च करण्यात आला. पंरतु अचानक लातूर महानगरपालिकेने पत्र पाठवून पूर्णत्वास आलेल्या कामास स्थगिती देण्यात आली. हा निर्णय लातूरचे पालकमंत्री यांच्या सांगण्यावरून घेण्यात आल्याचे समोर आलेले आहे. परंतु देशहितासाठी प्राणाची आहूती देणार्‍या शहीद वीर भगतसिंगांच्या एलईडी बोडर्र्ला विरोध काशासाठी? असा सवाल भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केलेला आहे.
यावेळी ते शहीद भगतसिंग चौकात आयोजित निदर्शने आंदोलनात बोलत होते. या चौकात लोकनेते विलासराव देशमुख यांचा पुतळा बसविण्याचे लातूर महानगरपलिकेचे नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. स्व.विलासराव देशमुख यांचे खूप मोठे काम आहे. त्यांच्या पुतळा बसवावा ही आमचीही भावना आहे. परंतु शहीद भगतसिंग यांचे नाव चौकाला कायम ठेवून बोर्ड ठेवावा, अशी मागणी आहे. मनपाच्या सर्वसाधारण सभेत या चौकात लोकनेते स्व.विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याचा ठराव 22 मे 2013 रोजी घेतला होता. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी लातूर महानरपालिकेला जाग आली पंरतु लातूर महानगरपालिकेने स्थायी समितीचे माजी सभापती अ‍ॅड.दीपक मठपती यांच्या उपस्थितीत 24 डिसेंबर 2021 रोजी शहीर वीर भगतसिंग चौक नामकरणाचा ठराव घेतला आणि अकाली सेनेचे अध्यक्ष गुलजितसिंग जुन्‍नी, प्रज्ज्वल उबाळे, विनोद कोल्हे, राहूल पाटील, भीमा गाढवे, शरीफ शेख, शंकर नागभूजंगे, संतोष कोटे, अमोल गुंजरगे, आश्‍विन कांबळे, राहूल क्षीरसागर, राजसिंग जुन्‍नी, आकाशसिंग जुन्‍नी या तरूणांनी स्वखर्चातून शहीर वीर भगतसिंग चौक नावाचा एलईडी फलक लोकसहभागातून बसविण्याचे काम सुरू केले. ते पूर्णत्त्वास येत नाही तोच लातूर महानगरपालिकेने त्यांना लेखी पत्र देऊन काम थांबविण्याची सूचना केलेली आहे. त्यामुळे या तरूणांना तब्बल आठ लाखांचा फटका बसलेला आहे. त्यामुळे लातूरचे पालकमंत्री महोदयांनी देशहिताचा विचार करून शहीर भगतसिंग यांच्या नावाचा फलकतरी लावण्यास परवानगी द्यावी अन्यथा याचे परिणाम येणार्‍या काळात भोगावे लागतील असा इशाराही युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment