दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Wednesday, June 8, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी



 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 


⚡ RBI चा सर्वसामान्यांना आणखी मोठा धक्का! :


आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात आले आहेत. याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती गवर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. महागाईला अटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने रेपो रेट मे महिन्यात 0.40 टक्क्यांनी वाढवण्यात आले होते. या दरवाढीनंतर 4.40 टक्के रेपो रेट झाला होता. आज 0.50 टक्क्यांनी आणखी रेपो दर वाढवण्यात आले आहेत. आता रेपो दर 4.90 % इतका असणार आहे. यामुळे सगळ्या प्रकारची कर्ज महाग होणार आहेत. 


🇮🇳 पर्यावरण निर्देशांकात भारत सर्वात खालच्या क्रमांकावर :


पर्यावरणीय कामगिरीच्या बाबतीत, यूएस-आधारित संस्थांच्या निर्देशांकात भारत 180 देशांमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. येल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल लॉ अँड पॉलिसी आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी सेंटर फॉर इंटरनॅशनल अर्थ सायन्स इन्फॉर्मेशन नेटवर्क द्वारे नुकत्याच प्रकाशित झालेल्या 2022 एनव्हायर्नमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स (EPI) मध्ये डेन्मार्क अव्वल आहे. अहवालात म्हटले आहे की, भारत (18.9), म्यानमार (19.4), व्हिएतनाम (20.1), बांगलादेश (23.1) आणि पाकिस्तान (24.6) यांना सर्वात कमी गुण मिळाले आहेत.


📍 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा


राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. 


😎 राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी :


राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना, भाजपमध्ये जोरदार चुरस आहे. अपक्ष आमदारांना, लहान पक्षांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. त्यासोबतच आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत यासाठी दोन्ही पक्षांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेनं आपल्या आमदारांना व्हिप बजावला आहे. पक्षादेशाप्रमाणे मतदान करण्याच्या सूचना आमदारांना करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे.


👩‍🔬 राज्यातील 3 संशोधकांना मोठे यश


रक्तदाब या घातक विकारामुळे जगभरातील लाखो लोक त्रस्त आहेत. या आजारावर नियंत्रण आण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. अशातच राज्यातील 3 संशोधकांना रक्तदाबावर प्रभावी औषध शोधण्यात मोठे यश आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या औषधाला केंद्र सरकारकडून पेटंटचे अधिकारदेखील प्राप्त झाले आहेत. औरंगाबादचे डॉ. आनंद कुलकर्णी, जळगावचे डॉ. जितेंद्र नाईक आणि डॉ. संजय तोष्णीवाल यांनी ही मोलाची कामगिरी केली आहे.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment