केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून अभिनंदन* - latur saptrang

Breaking

Wednesday, June 1, 2022

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून अभिनंदन*

 *केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून अभिनंदन*



*नाशिक,दि.३१ मे :-* नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल जाहीर  झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.



मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत महाराष्ट्रातील ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील अक्षय वाखारे, स्वप्नील पवार, अपूर्व अस्मर व प्रशांत डगळे यांनी यश संपादन केले असून नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परिक्षा अतिशय उच्चपदावरील परिक्षा आहे. यातून देशपातळीवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी देशहिताच्या दृष्टीने अतिशय प्रामाणिक आणि निष्ठेने काम करून देशाचे नाव अधिक उज्वल करावे असे आवाहन करत मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहे.

No comments:

Post a Comment