विद्यार्थ्यास नुकसानभरपाई देण्याचे
त्रिपुरा विज्ञान महाविद्यालयास आदेश
लातूर, दि. १७ (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या नया सवेरा योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समुदायातील विद्या्थ्यांसाठी मुफ्त कोचिंग असताना प्रवेश देऊन शिकवणी पोटी शुल्क घेतल्याप्रकरणी येथील संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट व त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या (रिलायन्स लातूर पॅटर्न) विरोधात ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी ट्रस्ट व महाविद्यालयाने विद्यार्थ्यास ८० हजार रुपये शुल्कासह मानसिक त्रासापोटी २० हजार व तक्रारींचा खर्च पाच हजार रूपये देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
याबाबत अॅड. आसिफ पटेल यांनी दिलेली माहिती अशी : शहरातील संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयात मुजफ्फर आरिफ पटेल या विद्यार्थ्याने वर्ष २०१७-२०१८ मध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेतला. केंद्र सरकारच्या नया सवेरा योजनेत ११ वी व १२ वीचे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्वतयारी चे शिक्षण निःशुल्क मिळते. या योजनेत प्रवेश घेतल्यास शुल्कमाफीसह शिक्षण, निवास व भोजन व्यवस्था आहे परंतु या सुविधा महाविद्यालयंने पुरविली नाही उलटपक्षी दरवर्षी ४० हजारांप्रमाणे दोन वर्षांचे ८० हजार रूपये विद्यार्थ्याकदून शुल्क भरून घेतले भरल्यास नया सवेरा योजनेत परत मिळेल, असे सांगण्यात आले. सदरील रक्कम परत न मिळाल्याने मुजफ्फर पटेल याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग लातूर कडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आयोगाच्या अध्यक्षा रेखा जाधव व सदस्य रवींद्र राठोडकर यांच्यासमोर सुनावणी झाली.
याप्रकरणी संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट व त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यास शिकवणी शुल्कापोटी ८० हजार रुपये, मानसिक त्रासापोटी २० हजार व तक्रार खर्चापोटी पाच हजार रुपये द्यावेत तसेच दि. १७ जानेवारी २०१७ पासून दर साल दर शेकडा सहा टक्के दराने व्याज द्यावे, असे आदेश आयोगाने त्रिपुरा कानिष्ट विज्ञान महावि्यालय व संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट लातूर यांचेविरुद्ध दिले आहेत. याप्रकरणी तक्रारकर्ता यांच्या वतीने अॅड. आसिफ पटेल यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment