दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
🌧️ सोमवारपासून राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता
राज्यात मान्सून पुन्हा जोरकसपणे सक्रिय होण्याचा अंदाज असून, सोमवारपासून राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत कोकण, गोव्यात तसेच विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मध्य भारतात तयार झालेल्या पश्चिमी चक्रावातामुळे तसेच अरबी समुद्रावरून येणाऱ्या दक्षिण पश्चिमी वाऱ्यांमुळे विदर्भात रविवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील चार दिवसांमध्ये या भागात अनेक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
💉 चाचणी पूर्ण! नेझल कोरोना व्हॅक्सिन लवकरच येणार
देशासह जगभरात कोरोनाचा संसर्ग कायम आहे. जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. अद्याप कोरोनावरील पूर्ण उपचार सापडलेला नाही. आता लवकरच कोरोनाची नेझल व्हॅक्सिन म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणारी लस येणार आहे. भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
💥 आसाममध्ये पुरामुळं 28 जिल्ह्यांना फटका; 54 लोकांचा मृत्यू
आसाममध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणची हजारो लोक बाधित झाले आहेत. अनेक लोकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आलं आहे.
🎯 नीरज चोप्राने जिंकले आणखी एक सुवर्णपदक
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने कुओर्तने गेम्समध्ये 86.69 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. नीरजने त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट आणि ग्रॅनडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स यांना हरवून सुवर्णपदक पटकावले.
🏏 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज निर्णायक टी-20 लढत
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना बंगळुरुच्या एम.चिन्नस्वामी मैदानावर खेळवला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात 47 धावांनी आणि चौथ्या सामन्यात 82 धावांनी विजय मिळवले. आज अंतिम सामना असून या निर्णायक सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. कारण बंगळुरू शहरात आज पावसाची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क -90491 95786
No comments:
Post a Comment