CBSE चा नवा अभ्यासक्रम लागू, इस्लामचा उदय अन् मुघल साम्राज्याचा इतिहास वगळला
राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSE ने या शैक्षणिक सत्रातील अभ्यासक्रमात काही बदल केला आहे. चालु वर्षी २०२२-२३ च्या इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत काही विषयांच्या अभ्यासक्रमातून धडे काढून टाकण्यात आले आहेत. सीबीएसईने या सत्रासाठी नवीन अभ्यासक्रम वेबसाइटवर अपलोड केला आहे. याशिवाय इयत्ता ९वी मधील कविता विभागातून चंद्रकात देवतळे यांनी लिहलेला काही मजकूर काढून टाकण्यात आला आहे. (CBSE syllabus change)
याशिवाय ११ वीतील इतिहासाच्या पुस्तकातून इस्लामचा उदय आणि बारावीच्या पुस्तकातून मुघल साम्राज्य हे धडे काढून टाकण्यात आले आहेत. सीबीएससीने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार, दहावीच्या पुस्कातील एका प्रकरणातील जात, धर्म आणि लिंग या विषयात उदाहरण म्हणून दिलेली फैज अहमद फैज यांची कविताही काढून टाकण्यात आली आहे.
जागतिक इतिहास या 11 वी च्या पुस्तकातून सेंट्रल इस्लामिक लँडचा अध्याय काढून टाकण्यात आला आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांना इस्लामचा उदय आणि विकास तसेच सातव्या ते बाराव्या शतकापर्यंत इस्लामच्या प्रसाराविषयी माहिती देण्यात आली होती. त्याचप्रमाणे बारावीच्या इतिहासातील नऊ नंबरच्या अध्यायातून मुघल साम्राज्य काढून टाकण्यात आले आहे. ही शिक्षण मंडळाची बदलेली प्रणाली असून एकाच वेळी संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून हे धडे शिकवले जाणार नाहीत, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे
CBSC शिक्षण मंडळाने बारावीच्या पुस्तकातून पाषाणयुगातील मानवाचा पृथ्वीवरील उदय आणि विकास तसेच औद्योगिक क्रांती हे विषयही अभ्यासक्रमातून वगळले आहेत. इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीची कारणे आणि परिणाम, साम्राज्यवादाचा प्रचार कसा झाला, यामध्ये इत्यादींचा समावेश होता.
यासंदर्भात एका हिंदी शिक्षिकेने सांगितल्यानुसार, बारावीच्या वर्गातून हिंदीतील मीठाचा मजकूर काढून टाकला आहे. भारत-पाक फाळणीनंतर सीमेच्या दोन्ही बाजूला विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनामुळे लोकांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या काही हृदयस्पर्शी कथा यामध्ये आहेत. दहावीपासून सर्वेश्वर दयाळ सक्सेना यांचा मानवी करुणेचा दैवी चमक, पंचम जॉर्जचे नाक, ऋतुराज यांचा कन्यादान असे धडेही काढण्यात आले आहेत. 11 वी मधील सेंट्रल इस्लामिक भूमी आणि मुघल साम्राज्याचा मजकूर काढून टाकण्यात आला असून रोमन साम्राज्य हटवले गेलेले नाही. याशिवाय इतर मजकूरही काढून टाकण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment