लातूर/प्रतिनिधी
तळागाळातील दुर्लक्षित घटकापैकी असलेल्या अनाथ, दिव्यांग या घटकाकडे आजपर्यंत कोणीही लक्ष न दिल्यामुळे त्यांचा विवाह किंवा सामूहिक विवाह करून देण्यास कोणी तयार होत नव्हते. अनाथ, दिव्यांगाची ही व्यथा पाहुन भारतीय अंधजन शिक्षण व प्रशिक्षण मंडळ तसेच सामाजिक, कार्यकर्ते, पत्रकार यांनी सामाजिक जाणीवेतुन एकत्र येवून आज 24 जून रोजी लातूरच्या सिद्धेश्वर मंदीराजवळ च्या सिद्धेश्वर मंगल कार्यालयात सहा अनाथ- दिव्यांग जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळा थाटात लावण्यात आला. अनाथ दिव्यांग यांना आधार ठरनारा हा उपक्रम वर्षानुवर्षे सुरुच राहील, असे संयोजकानी म्हटले आहे.
या विवाह सोहळयास भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव प्रा. प्रेरणा होनराव, पत्रकार विचारवंत चिंचोले, पंडित हनमंते, मुरली चेंगटे, शिवानंद पटने, संजय उदारे, नितिन भाले, लिंबराज पन्हाळकर, शरद पवार, कॉंग्रेसचे ऍड. देवीदास बोरूळे आदि मान्यवरासह इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment