सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांचे पंचनामे होणार - latur saptrang

Breaking

Sunday, July 17, 2022

सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांचे पंचनामे होणार



 सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांचे पंचनामे होणार

माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍या मागणीने मुख्‍यमंत्र्याचे निर्देश

 

लातूर प्रतिनिधी:- जिल्‍हयात खरीप हंगामासाठी सोयाबीनचा पेरा ८० टक्‍केपेक्षा अधिक असतो. सोयाबीनसह इतर पिकांची पेरणी झाल्‍यानंतर गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झालेला आहे. त्‍याचबरोबर गेल्‍या काही दिवसात सातत्‍याने होणा-या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे. त्‍यामुळेच गोगलगायींचा प्रादुर्भाव व पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांचे पंचनामे करण्‍यासाठी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासह उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे पत्राद्वारे केली होती. आ.निलंगेकर यांनी पत्र देवून केलेल्‍या पाठपुराव्‍यामुळे नुकसान झालेल्‍या पिकांचे पंचनामे करण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास दिले आहेत.

जिल्‍हयात खरीपाची पेरणी बहुतांश पूर्णपणे झालेली आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्‍याने झालेल्‍या खरीपाच्‍या पिकांवर गोगलगायींसह इतर रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झालेला होता. यामुळे बहुतांश पिके नष्‍ट होण्‍याची परिस्थिती निर्माण झालेली होती. त्‍यातच गत काही दिवसापासून जिल्‍हयात सर्वदुर मोठया प्रमाणात पावसाने हजरी लावलेली आहे. काही भागामध्‍ये तर अतिवृष्‍टी तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झालेली होती. सध्‍या पाऊस सातत्‍याने पडत असल्‍याने पेरणी केलेली पिके वाहुन गेलेली असुन अतिवृष्‍टीने अनेक शेतीक्षेत्रामध्‍ये पावसाचे पाणी थांबलेले पाहण्‍यास मिळत आहे. परिणामी शेताक-यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे. गोगलगायींचा प्रादुर्भाव व पावसाने नुकसान झालेल्‍या सोयाबीनसह इतर खरीप पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे होवून शेतक-यांना मदत मिळणे अपेक्षित आहे. सदर बाब लक्षात घेवूनच माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी याबाबत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासह उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे पत्र देवून नुकसान झालेल्‍या पिकांचे पंचनामे करण्‍याची मागणी केलेली होती. सदर मागणीला यश आलेले असुन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्‍त खरीप पिकांचे पंचनामे करण्‍याचे आदेश प्रशासनास दिलेले आहे. माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्‍या मागणीमुळे शेतक-यांना दिलासा मिळालेला असुन यामुळे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांचे शेतक-यांकडुन आभार व्‍यक्‍त होत आहेत. 

No comments:

Post a Comment