राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस; एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात - latur saptrang

Breaking

Friday, July 22, 2022

राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस; एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

मुंबई, दि.२२ : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१)-२, पालघर-१, रायगड-महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ पथक तैनात आहेत.

नांदेड-१, गडचिरोली-१ असे एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती

राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.

00000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Ze1wihD
https://ift.tt/MaQ7KPx

No comments:

Post a Comment