‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिकेस प्रत्येकी १० लाख रुपये निधी - latur saptrang

Breaking

Friday, July 22, 2022

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिकेस प्रत्येकी १० लाख रुपये निधी

मुंबई, दि. 22 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई जिल्ह्यात या महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे. जनसामान्यांचा अधिकाधिक सहभाग मिळण्याच्या हेतूने स्वराज्य महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबई शहर व महानगरपालिका यांना प्रत्येकी 10 लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांच्यामार्फत हा निधी मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व तालुके आणि पंचायत समित्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये निधी वितरणास मान्यता

राज्यातील सर्व तालुके आणि पंचायत समित्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/22.7.22



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Ws8uycK
https://ift.tt/MaQ7KPx

No comments:

Post a Comment