‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या दिनेश वाघमारे यांची मुलाखत - latur saptrang

Breaking

Wednesday, July 27, 2022

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या दिनेश वाघमारे यांची मुलाखत

मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तसेच महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार, दि. 28 जुलै २०२२ रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत `उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य` ऊर्जा महोत्सव पॉवर @2047 होणार आहे.  राज्यातही या महोत्सवांतर्गत विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, याविषयीची सविस्तर माहिती श्री. वाघमारे यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून  दिली आहे.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/z8kYDhn
https://ift.tt/fWZVx9a

No comments:

Post a Comment