दिशा प्रतिष्ठान लातूर यांचा ग्राम समन्वयक मेळावा उत्साहात संपन्न. - latur saptrang

Breaking

Wednesday, July 27, 2022

दिशा प्रतिष्ठान लातूर यांचा ग्राम समन्वयक मेळावा उत्साहात संपन्न.






 दिशा प्रतिष्ठान लातूर यांचा ग्राम समन्वयक मेळावा उत्साहात संपन्न.


                   दिनांक २५ जुलै २०२२ रोजी दिशा प्रतिष्ठान संचलित” फिरता दवाखान्याच्या “ वर्षपूर्ती निमित्त ग्राम समन्वयक यांचा स्नेहमेळावा मा.श्री.अभिजितभैय्या देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  विष्णुदास मंगलकार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता,यात त्यांनी सर्व समन्वयक यांच्याशी हितगुज साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.

                   यावेळी या मेळाव्यात दिशा प्रतिष्ठान संचलित “फिरता दवाखाना “ मार्फत आरोग्य सेवा चालू असून यात लातूर जिल्यामधील  विविध तालुक्यातील  एकूण ५० ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवा देत असून, यात अनेक ग्राम समन्वयक यांच्या मदतीने हे सामाजिक कार्य चालू असून या सर्वांच्या अडी-अडचणी तसेच चर्चा सत्र या मेळाव्यात आयोजित केले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक इसरार सगरे यांनी केले,त्यात त्यांनी फिरता दवाखाना बाबत माहिती दिली तसेच अध्यक्ष श्री.सोनू डगवाले यांनी आज पर्यत आरोग्य सेवा तसेच शिक्षण क्षेत्रातील दिशा प्रतिष्ठान मार्फत केलेल्या कामकाज यांची माहिती सर्वा समोर मांडली.

                तसेच या स्नेहमेळाव्यात लातूर,अहमदपूर,चाकूर,देवणी,शिरूरअनंतपाळ, रेणापूर,निलंगा,औसा, तालुक्यातील एकूण ५० ग्राम समन्वयक यांची उपस्थिती होती. यावेळी ग्राम समन्वयक श्री रामदास काळे,श्री अनिल पाटील, श्री.द्याश्नेश्वर जाधव,श्री द्यानेश्वर भिसे, श्री.निलेश देशमुख ,श्री.गणेश सूर्यवंशी,श्रीओमप्रकाश कातळे यांनी मनोगत व्यक्त केली. या स्नेह मेळाव्यात दिशा प्रतिष्ठान चे सर्व संचालक ,डॉक्टर,कर्मचारी उपस्थित होते.                                                                                                 यावेळी या सर्वांचे आभार संचालक श्री.विष्णुदास धायगुडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment