दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
💁♂️ दिल्लीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग :
दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्याआधी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नव्या आणि तरूण चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.
😎 नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी :
एकनाथ शिंदे गटाला सामील झालेल्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा आणि महापालिका विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने ,पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे नवी मुंबईत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
💥 मोठी बातमी! सोलापूरमध्ये भूकंपाचे धक्के :
सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील काही गावासह भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. हे धक्के सौम्य असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. भूकंपाचं केंद्र कर्नाटकातील विजयपूर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंप धक्का जाणवला आहे. भूकंपाचे धक्के बसल्याने काहीसं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
🗣️ महाराष्ट्रात सेनेचा नव्हे भाजपचाच मुख्यमंत्री - संजय राऊत :
शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीत जात नाही, एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे. मुंबईचे तुकडे करण्याचा भाजपचा विचार लपून राहिलेला नाही, त्या दृष्टीने त्यांनी काम सुरू आहे. शिवसेनेचे हायकमांड हे मातोश्रीवर आहे, आम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी दिल्लीत जावे लागत नाही. असे स्पष्ट कारत एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
👀 एलन मस्क यांनी रद्द केला ट्विटरचा सौदा :
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा सौदा रद्द करण्याची घोषणा केली. 44 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 3.37 लाख कोटी रुपयांचा हा सौदा रद्दबातल करताना मस्क यांनी कंपनीला आपल्या व्यासपीठावर अस्तित्वात असलेल्या फेक अकाउंट्सची माहिती गोळा करण्यात अपयश आल्याचा आरोप केला. दुसरीकडे, ट्विटर बोर्डाचे चेअरमन ब्रेट टायलो यांनी हा करार लागू करण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची घोषणा केली आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment