अन्यथा रास्ता रोको करू- निलंगा यूथचा इशारा
निलंगा प्रतिनिधि निलंगा येथील बस स्टैंड येथील प्रसाधन गृह व नवालाच असलेली पोलिस चौकी तात्काळ सुरु करा अन्यथा येत्या 10 व्या दिवशी छत्रपति शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा निलंगा युथ मार्फत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
निलंगा येथील नवीन इमारतीच्या बाँधकामाचे कारण दाखवत सुरळीतपने चालू असलेले जुने प्रसाधन गृह तोड़न्यात आले नवीन इमारतीचे काम गेल्या अनेक महिन्यापासुन रखडलेले आहे यामुळे नागरिकांची प्रचंड ग़ैरसोये होत आहे.
पुरुष लघुशंकेसाठी भिंतिचा अडोसा घेत असले तरि माहिलांची मोठी अडचण होत आहे याचाच फायदा काही आंबट शौकीन लोक घेत आहेत यामुळे शहराची प्रतिमा खालवली जात आहे
बस स्टैंड येथील पोलीस चौकी नवालाच असून बंद असते यामुळे महिला व मुलींची छळ होत आहे शिवाय चोरीच्या घटना वाढल्या आहेत तसेच नवीन बाँधकामाच्या ठिकाणी नको ते धंदे चालू आहेत अशा घटनाना आळा बसवन्यासाठी पोलिस चौकी कायम चालू करण्यात यावी व महिला पोलीस कर्मचारयांची नियुक्ति करण्यात यावी अशी मागणी निलंगा युथ मार्फ़त करण्यात आली आहे या मागण्या येत्या दहा दिवसात पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रशन निर्माण झाल्यास सर्वस्वी जाबाबदार प्रशासन राहिल असा उल्लेख केला आहे
सदरिल निवेदनावर मुजीब सौदागर, मेघराज जेवळीकर,दत्ता माहोळकर,महेश ढगे, राणा आर्य,शरद पेठकर,सबदर कादरी,हीरा कादरी,अमोल सूर्यवंशी, नीलेश गायकवाड़,बाबा शेख,संतोष तुगावे,चेतन माहोळकर,अतुल सोनकांबळे,राम मदने, योगेश कांबळे, विशाल खलसे,अजय ढ़वळे,प्रतीक शेळके,जफर हाशमी,दगड़ू चौधरी, मोइज काझी आदिसह शेकडो युवकांच्या स्वक्षरया आहेत
No comments:
Post a Comment