शिंदे गटाला धक्का! ‘हा’ आमदार भ्रष्टाचारी; मंत्रीपद देऊ नका; भाजपा
पदाधिकारी फडणवीसांसह अमित शाहांना लिहिणार पत्र
सामील होऊन भाजपची आश्रयछाया मिळवणाऱ्या जयस्वाल यांच्या विरुद्ध भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने इतके गंभीर आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. ठाकरे म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे आ. जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाराची सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठविणार आहे. त्यांना पत्र लिहून आ. जयस्वाल यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देऊ नये, अशी मागणी करणार आहे”.
शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जयस्वाल यांच्या मर्जीतील लोकांनी धान खरेदी केंद्र उघडून राज्यातील नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील शेतकऱ्यांकडून आयात केलेले धान्य खरेदी केले. त्यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार जयस्वाल यांनी केला. एका शेतकऱ्यांचे धानविक्रीचे १४ लाख ५२ हजार रुपये जयस्वाल यांनी हडपल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
लोहकरे, साठवणे हत्याकांडाशी संबंध
मॅक्सवर्थ कंपनीशी साटेलोटे करून जयस्वाल यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या नावावर कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकल्या. ५० पेक्षा जास्त कंपन्या आ. जयस्वाल यांनी नातेवाईकांच्या नावावर स्थापन केल्या आहेत. लोहकरे हत्याकांड आणि साठवणे हत्याकांडाचेही धागेदोरे आ. जयस्वाल यांच्याशी जुळत असल्याचा आरोप या पत्रपरिषदेत करण्यात आला.
ईडीकडून चौकशी करा
आ. जयस्वाल यांनी कोट्यवधीचा गैरव्यवहार केला आहे. त्यांनी कोट्यवधीची जमीन विकत घेतली आहे. त्यांनी नातेवाईकांच्या नावाने संपत्ती घेतली आहे. त्यामुळे जयस्वाल यांची ईडी चौकशी करण्यात यावी. तसेच सीबीआयनेही चौकशी करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
No comments:
Post a Comment