प्रवाशी महिलेला लुटणाऱ्या आरोपीतांना पोलीसांनी ४८ तासात केले जेरबंद
पोलीस ठाणे मुरुड ता.जि.लातुर गु.र.न. १८७/२०२२ कलम ३९२,३४ भादंवि गुन्हयातील फिर्यादी नामे सौ अनुसया अंकुश बोकडे वय-३८ वर्ष रा.शिऊर यांनी दि.०३/०७/२०२२ रोजी फिर्याद दिली की,ती दि.३०/०६/२०२२ रोजी १७.३० वा.सु. ७ मजली डी.सी.सी.बँक लातुर येथुन येथुन शिऊर येथे जाण्यासाठी एका अज्ञात अॅटो मध्ये बसुन शिऊर कडे जात असतांना शिऊर पाटीजवळ सदर अँटो चालकाने व त्याचे सोबतचे साथीदारांने अॅटो थांबवुन फिर्यादीस चापटाने मारहाण करुन,तीचे तोंड दाबुन तीचे गळयातील व कानातील १२ ग्रॅम सोन्याचे दागीने किमंत ४५,०००/- रुपये किमतीचा मुद्येमाल बळजबरीने चोरुन नेला आहे.वगैरे मजकुराचे फिर्याद वरुन अनोळखी अॅटो चालक व त्याचे साथीदारा विरुध्द पोलीस ठाणे मुरुड येथे वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणणे कामी मा.पोलीस अधिक्षक श्री निखील पिंगळे साहेब,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन साहेब,श्री सुनील गोसावी साहेब उप.वि.पो.अ.लातुर ग्रामिण यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे तपासा दरम्यान गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाले वरुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सपोनि ढोणे,पोउपनि आटरगे पोलीस अमंलदार रतन शेख पोना/८५२,बाबासाहेब खोपे पोना/८२७,महेश पवार पोका/१२४१, नागेश बोईनवाड पोना/१४८२,विठ्ठल साठे पोना/१३७४,बहादुरअली सय्यद पोना/१५४६,चालक पोह/१५४१ रामचंद्र जाधव,सचिन राठोड पोना/१६१४,अतुल पतंगे पोना/१२१८,वाल्मीक केंद्रे पोना/१८५ यांनी संदर गुन्हयातील अनोळाखी अॅटो चालक व त्याचा साथीदार यांचा शिऊर, सावरगाव, वासनगाव,धानोरी,गातेगाव,कासार जवळा,जोड जवळा,लातुर येथे शोध गुन्हा दाखल झाले पासुन ४८ तासा मध्ये आरोपीतांचा व अॅटोचा शोध घेवुन अॅटो चालक आरोपी नामे १) ईश्वर डिगांबर सवासे वय-२८ वर्ष रा.कासार जवळा ता.जि.लातुर व त्याचा साथीदार २)कृष्णा पांडुरंग जोगदंड वय-२७ वर्ष रा.गातेगाव ता.जि.लातुर हे निष्पन्न झालेने.त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला अॅटो क्रमांक एम.एच.२४ ए.टी.२१३९ सह ताब्यात घेवुन त्यांना दि.०५/०७/२०२२ रोजी अटक करुन त्यांचे कडुन सदर गुन्हयातील जबरी चोरी केलेले ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके किमंत २५,०००/- रुपये व अॅटो किमंत १,५०,०००/- रुपये असा एकुण १,७५,०००/- रुपयाचा माल हस्तगत केला आहे.
. सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक श्री निखील पिंगळे साहेब,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन साहेब,श्री सुनील गोसावी साहेब उप.वि.पो.अ.लातुर ग्रामिण यांचे मार्ग दर्शनाखाली पार पाडली.
No comments:
Post a Comment