मनुवाद्याविरुद्ध लढा देण्यासाठी दलित - मुस्लिम,ओबीसींनी एकत्र येण्याची गरज - फारूक अहमद - latur saptrang

Breaking

Friday, July 8, 2022

मनुवाद्याविरुद्ध लढा देण्यासाठी दलित - मुस्लिम,ओबीसींनी एकत्र येण्याची गरज - फारूक अहमद



 मनुवाद्याविरुद्ध लढा देण्यासाठी दलित - मुस्लिम,ओबीसींनी एकत्र येण्याची गरज - फारूक अहमद


जिल्ह्यातील विविध पक्ष,संघटनेच्या शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
लातूर / मागील काही दिवसांपासून देशात वाढत चाललेल्या धर्मांध शक्ती, मनुवादी विचारसरणीला खतपाणी घालण्याचे काम करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात लढा देण्यासाठी समस्त दलित - मुस्लिम, ओबीसींसह इतर वंचित घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी केले, शहरातील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहामध्ये आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते.
          वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सलीम सय्यद यांच्या पुढाकारात जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी अँड प्रकाश आंबेडकर यांच्या विचारावर विश्वास दाखवून वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला. यावेळी फारूक अहमद हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
देशाचे संविधान, लोकशाही वाचवायचे असेल तर अँड प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. बौद्धांनी यामध्ये मोठ्या भावाची भूमिका निभवावी असेही अहमद यावेळी म्हणाले.

“सूरतेला जाण्यापेक्षा…”

    July 08, 2022  0

 Uddhav Thackeray PC: उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ. पण आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. याशिवाय संजय राठोड यांनीही सन्मानाने बोला...

Read More


आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी याप्रसंगी तुम्हाला संविधानानुसार तुमचे हक्क, अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे बहुजनांची तळमळ असणारे बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेते असून त्यांची ताकद वाढविण्यासाठी आपणाला सज्ज झाले पाहिजे.कोर्टाने मान्य केलेले मुस्लिमांचे 5 टक्के आरक्षण महाविकास आघाडी सरकारने देखील लागू केले नाही. अशा सरकारला खाली खेचायचे असेल तर सर्व वंचित समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचेही आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. मेळाव्यासाठी मंचावर आयोजक सलीम सय्यद, जिल्हा प्रभारी बालाजी शिंगे, मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, रमेश गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष मंजुताई निंबाळकर, शहराध्यक्षा सुजाताताई अजनीकर, जिल्हाध्यक्ष जगदीश माळी, मौलाना मुफ्तीसाब, डॉ. विजय अजनीकर, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराज जोगी, नूतन युवा महानगराध्यक्ष महेंद्र बनसोडे, हमाल मापाडी संघटनेचे अमोल बनसोडे, अहमदपूर तालुकाध्यक्ष जिलानी, शेख हमीदभाई, जिल्हा महासचिव भारतबाई कदम, मजहर पटेल, पी. डी. कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष माळी यांनी कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध पक्षातील विशेषतः एमआयएमचे खलील शेख, अहमद खान, उत्तम कांबळे, बंटी घोरपडे, शहाबुद्दीन मुजावर, खैरोद्दीन सत्तार, मनसेचे चांद पाशा शेख, बाबा अहमद, काँग्रेसचे राजाभाऊ मोरे, साहिल पठाण, वसीम नासरजंग, अजीम शेख, असिफ सय्यद, रफिक कुरेशी, शेख खादीम, शेख फैय्याज, शेख जावेद, यशवंत बोरीकर, इस्माईल कुरेशी, निलेश गवळी,अजीम शेख, सत्तार शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यावेळी बहुजन चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या अक्षय धावारे, अभिजीत बनसोडे, रवी कांबळे, शिवरुद्र बरुळे, राहुल सोनवणे, पीरपाशा शेख, विनोद कोल्हे, शाहीर कुलदीप कांबळे, सुभाष भालेराव, डॉ. ताहेर शेख, सुरेश सूर्यवंशी, आकाश इंगळे, सचिन लामतुरे, हमीदभाई शेख व जम्मू जुबेर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी केले.

No comments:

Post a Comment