दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
💥 जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार :
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. जपानच्या नारा शहरात ते भाषण करत असताना बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
😎 नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा - उद्धव ठाकरे :
शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' वर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्देवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
🗣️ 'सर्व जनता उद्धव ठाकरेंच्या सोबत - राऊत'
दिल्लीकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव सुरू आहे. असा आरोप संजय राऊतांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना केला आहे. मातोश्रीच्या पाठीत असा खंजीर कसा खुपसला जातो, या भावनेतून सर्व जनतेमध्ये रोष आहे. ही सर्व जनता उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
⚖️ शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात :
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी त्यांनी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सेनेच्या बंडखोर गटाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदेंनी गत 30 जून रोजी मुख्यमंत्री, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
🏏 सलग 13 टी-20 सामने जिंकणारा रोहित शर्मा पहिला कर्णधार :
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं इंग्लंडला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाची धुळ चाखली. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 50 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयामुळं रोहित शर्माच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सलग 13 सामने जिंकणार रोहित शर्मा पहिला कर्णधार ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला सलग 13 सामने जिंकता आले नाहीत.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 8888144111
No comments:
Post a Comment