दिवसभरातील ताज्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Friday, July 15, 2022

दिवसभरातील ताज्या घडामोडी



(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 



💁‍♂️ CA चा निकाल जाहीर, असा तपासा निकाल :


CA चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत वेबसाईट्स icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org वर जाऊन सहज तपासता येणार आहे. सीए अंतिम परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. यावर्षी, मे सत्रासाठी ICAI CA अंतिम परीक्षा 14 ते 30 मे दरम्यान घेण्यात आली होती.  


🚫 आता संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषणं करण्यावर बंदी :


संसदेचं पावसाळी 18 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घातल्यानंतर आता आणखी एक नवा आदेश लोकसभा सचिवालयानं खासदारांना दिला आहे. संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच संसद परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.


🌧️ पावसामुळे राज्यात आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू :


मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत अजूनही हवामान खात्याचा रेड अलर्ट कायम आहे. उर्वरित राज्यात काही प्रमाणात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज आहे.


👀 औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती :


ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि बा पाटील असं नामांतर करण्याच्या निर्णायाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली आहे. 


🗣️ संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर थेट निशाणा :


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारसह राज्यपालांवरही टीका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत असताना राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर राज्यातलं सरकार गोंधळलेलं आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. 


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क -9049195786

No comments:

Post a Comment