शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा; महाविकास आघाडीला धक्का देत सिद्ध केलं बहुमत
मुंबई : शिवसेनेतील नाराज आमदारांच्या गटाला सोबत घेत ठाकरे सरकारमधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली आणि आज अखेर या नव्या सरकारने विधिमंडळात आपलं बहुमत सिद्ध केलं आहे. बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते पडली, तर ९९ आमदारांनी विरोधात मतदान केलं.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज बहुमत चाचणीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर काही आमदार आपला अनुक्रमांक उच्चारत असताना विरोधी बाकांवरील आमदारांनी घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांचा अनुक्रमांक येताच आज पुन्हा 'ईडी-ईडी' अशा घोषणा देण्यात आल्या. पण आज यामिनी जाधव यांनी हात जोडत सर्वांना उत्तर दिलं. कालही अशीच घोषणाबाजी झाली तेव्हा यामिनी जाधव यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.

दरम्यान, बहुमत चाचणीसारखी मोठी घटना घडत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार मात्र कामकाज सुरू झाल्यानंतर विधिमंडळ परिसरात पोहोचले. परिणामी या आमदारांना मतदान करता आलं नाही.
कोणते आमदार उशिरा पोहोचले?
१. अशोक चव्हाण
२. विजय वडेट्टीवार
३. संग्राम जगताप
४. अण्णा बनसोडे
५. निलेश लंके
६. शिरीष चौधरी
७. धीरज देशमुख
८. झिशान सिद्दिकी
कोणते आमदार उशिरा पोहोचले?
१. अशोक चव्हाण
२. विजय वडेट्टीवार
३. संग्राम जगताप
४. अण्णा बनसोडे
५. निलेश लंके
६. शिरीष चौधरी
७. धीरज देशमुख
८. झिशान सिद्दिकी
No comments:
Post a Comment