मी कुठे पैसे देण्यात भेदभाव केला? अजित पवारांनी मंत्र्यांना आकडेवारीच दाखवली
विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. आज शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडला यातही त्यांनी विजय मिळवला आहे. हा विश्वासदर्शक ठराव शिंदे सरकारने बहुमताने जिंकला आहे. दरम्यान, आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर टोलेबाजी सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यावेळी शिंदे सरकारमधील नेत्यांना टोमणे मारले आहेत. शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहातील भाषणादरम्यान ते बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीला बदनाम केलं गेलं. परंतु निधी वाटपात राष्ट्रवादीने कधीच कुणासोबत अन्याय केलेला नाही, असं सांगत अजित पवारांनी मंत्र्यांना आकडेवारीच दाखवली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदेंना 12 हजार कोटी दिले, असे सांगत पवारांनी सेना नेत्यांना दिलेल्या निधीची यादी वाचून दाखवली आहे.
ते म्हणाले, १०६ आमदार असलेल्या पक्षाचा आमदार मुख्यमंत्री नाही मात्र ४० आमदार असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो यात नक्की काहीतरी काळबेरं आहे त्यामुळे जपून रहा, असा सल्लाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे. पुढे ते
No comments:
Post a Comment