दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
😍 राज्यात पेट्रोल 5, डिझेल 3 रुपयांनी स्वस्त :
राज्यात पेट्रोलच्या करात 5 रुपये आणि डिझेलच्या करात 3 रुपये कपात केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सरपंच, नगराध्यक्षांची निवड थेट लोकांमधून होणार आहे. आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेल्यांना अनुदान मिळणार तर बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान करता येणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान, पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना योजनेतून वगळणार नाही.
🗣️ राज्यात महापूर, पण सरकार कुठंय? :
राज्यात महापुराने थैमान घातले आहे. मात्र, सरकार स्थापन होऊन 14 दिवस उलटल्यानंतरही मंत्रिमंडळाचे अस्तित्व नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सध्या वाऱ्यावर आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता राज्य सरकारला मार्गदर्शन का करत नाही, असा खोचक सवालही त्यांनी विचारला
😎 रुपयाच्या घसरणीने गाठला ऐतिहासिक नीचांक :
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने आज पुन्हा एकदा ऐतिहासिक नीचांक गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 79.86 रुपयांचा स्तर गाठला होता. त्यानंतर काही वेळाने रुपया सावरला असून सध्या 79.84 रुपयाच्या स्तरावर दिसत आहे. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयांने 79.81 चा स्तर गाठला होता.
🏏 वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा :
भारतीय संघ याच महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांचे सामने खेळणार आहे. दरम्यान याच मालिकेतील टी20 सामन्यांसाठी नुकताच भारतीय संघ जाहीर झाला आहे. टीम इंडिया अशी : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्याकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
💸 नेटफ्लिक्सचा सबस्क्रिप्शन प्लॅन आणखी स्वस्त :
नेटफ्लिक्स आता स्वस्त OTT स्ट्रिमिंग प्लॅन आणण्याच्या तयारीत आहेत. यासाठी नेटफ्लिक्सने आता मायक्रोसॉफ्टसोबत हातमिळवणी केली आहे. नेटफ्लिक्स जाहिरातीसह असलेल्या सबस्क्रिप्शनसाठी मायक्रोसॉफ्टसोबत भागीदार करणार आहे. नेटफ्लिक्स कंपनीनं सांगितलं आहे की, मायक्रोसॉफ्ट जागतिक तंत्रज्ञा आणि विक्रीमध्ये मदत करेल. नेटफ्लिक्सने एप्रिल महिन्यात अॅड सपोर्ट सबस्क्रिप्शन प्लॅनची घोषणा केली होती.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क -9049195786
No comments:
Post a Comment