शिवसेना-भाजपाची युती होणार? केसरकरांचं मोठं विधान, म्हणाले “पहिला फोन कोणी करायचा यावर…”
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युती होऊ शकते अशी चर्चा रंगली आहे. यादरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. मानपानात दोन्ही पक्षांची युती अडकली आहे अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. पहिला फोन कोणी करायचा यावरूनच युती खोळंबली असल्याचं केसरकरांनी सांगितलं आहे.
केसरकरांनी काय सांगितलं आहे –
“मी शिंदेंचा प्रवक्ता आहे, खासदारांचा नाही. ज्या दिवशी खासदार आमच्यावतीने तुम्ही बोला असं सांगतील, तेव्हा मी बोलेन. पण माझ्या माहितीनुसार हे गाडं मानपानावरुन अडलं आहे. आधी फोन कोणी करावा यावरुन मातोश्री आणि भाजपा श्रेष्ठी यांच्यात बोलणी अडली आहे,” असा खुलासा दीपक केसरकरांनी केला आहे.
No comments:
Post a Comment