Raj Thackeray: अमित ठाकरेंना भाजपकडून मंत्रिपदाच्या ऑफरची चर्चा, राज ठाकरे म्हणाले... - latur saptrang

Breaking

Thursday, July 14, 2022

Raj Thackeray: अमित ठाकरेंना भाजपकडून मंत्रिपदाच्या ऑफरची चर्चा, राज ठाकरे म्हणाले...

 


Raj Thackeray: अमित ठाकरेंना भाजपकडून मंत्रिपदाच्या ऑफरची चर्चा, राज ठाकरे म्हणाले...


मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. ही धादांत खोटी माहिती आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरणनिर्मिती करत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला यासंदर्भात माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे अमित ठाकरे (Amit Thackeray) कॅबिनेट मंत्री होणार असल्याच्या चर्चेला तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकाला भाजपने आपल्या बाजूला वळवले होते. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळले होते. त्यानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु, आता त्याही पुढे जात भाजप (BJP) अमित ठाकरे यांना मंत्रिपद देऊन पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची चर्चा होती.
अमित ठाकरे सध्या आमदार किंवा विधान परिषद सदस्य नाहीत. मात्र, शिवसेनेला शह देण्यासाठी ठाकरे घराण्यातील व्यक्तीला मंत्रिपद देण्याची चाल भाजपकडून खेळण्यात आल्याची माहिती आहे. यामागे शिवसेनेभोवती असणारे ठाकरे घराण्याचे वलय कमी करण्याचा प्रयत्न आहे. आमच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्यासारखा सामान्य शिवसैनिकही आहे आणि ठाकरे ब्रँडही आहे, असे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याविषयी भाजपने मनसेला ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट?

विधानसभेतील ५५ पैकी तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे हैराण झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी बुधवारी रात्री उशिरा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे समजते. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

No comments:

Post a Comment