नवी दिल्ली, १५: पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना वंदन करतानाच त्यांचे अनुकरण करून पर्यावरण संरक्षणासाठी कृतिशील योगदान देण्याचे आवाहन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
विश्व हरेला परिवार या संस्थेच्या वतीने येथील महाराष्ट्र सदनात आयोजित विश्व हरेला महोत्सवात श्री. कोश्यारी बोलत होते. उत्तर प्रदेशचे वने व पर्यावरण राज्यमंत्री अरुण कुमार सक्सेना, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ प्रदीप जोशी, अक्षयपात्र संस्थेचे स्वामी अनंत प्रभु आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल म्हणाले,भारत देशाचे चिंतन हे निसर्ग व पर्यावरणासोबत जोडलेले आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आढळते .बालपणी निसर्ग आणि पर्यावरणाच्या गोष्टी ऐकूनच या देशातील अनेक पिढ्या मोठया झाल्या आहे त.आज आधुनिक विज्ञानामुळे जग पुढारलेले आहे मात्र, या धकाधकीच्या व सुखनैव जीवनात प्रत्येकाने निसर्ग व पर्यावरणाशी आपली नाळ जोडून ठेवली पाहिजे असे श्री. कोश्यारी म्हणाले.
वृक्षलागवड, मृद व जल संवर्धन आदि माध्यमातून महाराष्ट्र, उत्तराखंड राज्यांसह देशाच्या विविध भागांमध्ये अनेक व्यक्ती व संस्था निसर्ग व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्य करीत आहेत. या सर्व निसर्गप्रेमी मंडळींच्या कार्याला सर्व स्तरातून वंदन करतानाच त्यांच्या या कार्याचे अनुकरण व्हावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. ‘विश्व हरेला परिवार’ या संस्थेच्या माध्यमातून उत्तराखंड व शेजारील राज्यांमध्ये सुरु असलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या कार्याचा गौरव करून त्यांनी या संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/5awrD4I
https://ift.tt/AuHRIe8
No comments:
Post a Comment