दिवसभरातील ताज्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Saturday, July 16, 2022

दिवसभरातील ताज्या घडामोडी

 दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 




😇 शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला :


एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. 


👍 एका सुधारणेसह नामांतराचा पुन्हा तोच निर्णय :


औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण, आता शिंदे सरकारने त्यात 'छत्रपती' या शब्दाची भर घालत 'छत्रपती संभाजीनगर' असे नामांतर केले आहे. तसेच, उस्मानाबादचे नामांतरदेखील पुन्हा धाराशिव करण्यात आले आहे.


🗣️ शिवसेना सोडलेले उद्धवस्त झाले - संजय राऊत :


सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात 'एक दुजे के लिये' हा सिनेमा सुरू आहे आणि या सिनेमाचा शेवट काय झाला हे आपल्याला माहिती आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. पुढे ते म्हणाले की, शिवसेना तुम्ही सोडलेली आहे. ज्यांनी शिवसेना सोडली ते उद्धवस्त झाले हा इतिहास आहे आणि इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही.


😎 केंद्र सरकारच्या GST विरोधात सर्व बाजार समित्या बंद :


अन्नधान्यासह काही जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात आज व्यापारी संघटनांनी एक दिवसाचा देशव्यापी लाक्षणिक बंद पुकारला आहे. 18 जुलैपासून पॅकिंग केलेल्या अनब्रँन्डेड अन्नधान्यासह काही वस्तूंवर जीएसटी लागू होणार आहे. त्याविरोधात आज व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे महत्त्वाच्या बाजारपेठांवर आज परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. 8 ते 10 टक्के दरवाढीचा बोजा ग्राहकांवरच पडणार आहे. जाणून घ्या राज्यातील एकूण परिस्थितीबाबत


🏸 पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक :


भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत खालच्या मानांकित जपानच्या सेईना कावाकामीचा पराभव करत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिलीय. या वर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावणाऱ्या दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं 32 मिनिट सुरु असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेईना कावाकामीचा 21-15, 21-7 असा पराभव केला. 


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून  जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment