दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Sunday, July 17, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

  दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 



🔥 सोमवारपासून महागाई रडवणार :


उद्या, 18 जुलैपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. सरकारने अनेक नव्या वस्तूंवर जीएसटी लागू केली आहे. नव्या जीएसटी दरानुसार, खाणं-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. अन्नधान्यांवरही जीएसटी लागू होणार आहे.  धान्य आणि डाळीच्या किंमतीत 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले. 


💉 200 कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण :


जगासह भारताही कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून सरकारकडून देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहिम राबवली. या पार्श्वभूमीवर भारताने मोठा विक्रम रचला आहे. देशव्यापी लसीकरणात भारताने 200 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. देशात 548 दिवसांमध्ये कोरोना लसीचे 200 कोटीहून डोस देण्यात आले आहेत.


👀 CM शिंदेंचा काँग्रेस, राष्ट्रवादीला दणका :


941 कोटींच्या नगर विकास विभागांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 245 कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. यामुळे हा विरोधी पक्षनेते अजित पवारांना धक्का मानला जात आहे. असे असताना मात्र शिवसेनेच्या आमदारांना सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला आहे.


🏸 पीव्ही सिंधूची जबरदस्त कामगिरी! :


सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं चीनच्या वांग झि यि  हीचा  21-9, 11-21, 21-15 असा पराभव केलाय. या कामगिरीसह पीव्ही सिंधू सुपर 500 विजेतेपदाची विजेती ठरलीय. पहिल्यांदाच पीव्ही सिंधूनं सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 


🏏 आज इंग्लंड विरुद्ध निर्णायक एकदिवसीय सामना :


भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका निर्णायक टप्प्यात आली आहे. या मालिकेतील तीसरा आणि शेवटा सामना आज मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकलेला असल्याने मालिका बरोबरीमध्ये आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिकादेखील जिंकले त्यामुळे दोन्ही संघ आज विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतील.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून latursaptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment