मुंबई, दि. 15 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नाटककार वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कला आणि कार्यावर आधारित वसंत वैभव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज सायंकाळी शिवाजी मंदिर, दादर येथे करण्यात आले.
वसंत कानेटकर हे लोकप्रिय नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि थोर विचारवंत होते. त्यांच्या अनेक नाटकांचे हजारोंपेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत.
वसंत वैभव या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते आणि जानवी पणशीकर (प्रभाकर पणशीकर यांच्या कन्या) यांचे हस्ते वसंत कानेटकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात झाली. कार्यक्रमाची संकल्पना वैजयंती आपटे यांची असून, लेखन व दिग्दर्शन रवींद्र खरे यांचे आहे. या कार्यक्रमात चारुदत्त आफळे, अभय जबडे, नितीन कानेटकर, विजय काळे, अविनाश ओगले, राहुल गोळे, सिध्दार्थ कुंभोजकर, राकेश घोलप, नरेंद्र वीर, गौरी पाटील, गौरी रत्नपारखे, चारुलता पाटणकर अशा दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/FdrqazX
https://ift.tt/SBn1j95
No comments:
Post a Comment