Business : गावात राहून ‘हा’ व्यवसाय करा, सरकारही करेल मदत!
Business : कोरोना महामारीनंतर देशात नोकऱ्यांच्या टंचाईची (Scarcity of jobs) समस्या निर्माण झाली आहे. मात्र, कोरोनानंतर आता परिस्थिती सामान्य होत असली तरी रोजगाराच्या समस्येतून देश अद्याप बाहेर आलेला नाही. लॉकडाऊनच्या वेळी, मोठ्या संख्येने लोक शहरांमधून त्यांच्या गावात स्थलांतरित (Immigrant) झाले होते, त्यापैकी बरेच लोक अजूनही त्यांच्या गावाभोवती कामाच्या शोधात आहेत. जे लोक गावातच आपला रोजगार सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना केंद्र सरकारची योजना मदत करू शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःहून थोडी गुंतवणूक (investment) करावी लागेल, नंतर सरकार तुम्हाला मदत करेल.
केंद्र सरकारच्या मृदा आरोग्य योजनेंतर्गत (Under the Soil Health Scheme of the Central Government) , तुम्ही ग्रामपंचायत स्तरावर एक मिनी माती परीक्षण प्रयोगशाळा उघडू शकता. देशातील ग्रामीण भागात चाचणी प्रयोगशाळा (Testing Laboratory) फारच कमी असून गावातील शेतकरीही माती परीक्षण करून घेण्यासाठी जागरूक होत आहेत. तुम्हालाही शेतीची आवड असेल तर तुम्ही हे काम तुमच्या गावातच सुरू करू शकता. या कामात भरपूर कमाईची क्षमता आहे.
लाभ कोण घेऊ शकतं? : ज्यांनी 10वी नंतर कृषी क्लिनिक (Agricultural Clinic) किंवा आयटीआयमधून कृषी संबंधित प्रशिक्षण घेतले आहे, ते या विशेष योजनेसाठी अर्ज करू शकतील. तुमचे वय 18 ते 40 वर्षे असावे आणि तुमचे कुटुंब शेतीशी निगडीत असावे.
अर्जाची प्रक्रिया काय आहे? : मिनी माती परीक्षण लॅब सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कृषी उपसंचालकांशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही ऑनलाईनद्वारे सरकारच्या soilhealth.dac.gov.in या वेबसाईटला भेट देऊन मृदा आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी संपर्क साधू शकता. चौकशीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 1800-180-1551 वर कॉल करू शकता. मृदा आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. यासंदर्भातील सर्व कार्यवाही जिल्ह्याच्या कृषी विभागाकडूनच केली जाणार आहे.
किती खर्च येईल? : पंचायतीच्या मिनी सॉईल हेल्थ कार्ड(Mini Soil Health Card) योजनेंतर्गत, चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 75 टक्के रक्कम देते. जर तुम्हाला लॅब ( lab) सुरू करायची असेल तर सरकारकडून तुम्हाला 3.75 लाख रुपये दिले जातील. हा व्यवसाय सुरू करून गावातच 15 ते 20 हजार रुपये कमावता येतात.
No comments:
Post a Comment