आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते रेणापूर शहरातील 17 कोटी 71 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण - latur saptrang

Breaking

Monday, August 22, 2022

आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते रेणापूर शहरातील 17 कोटी 71 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण



 आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते रेणापूर शहरातील 17 कोटी 71 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण

        रेणापूर शहरासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, अग्निशमन इमारतीचे उद्घाटन यासह विविध प्रभागातील सिमेंट रस्ता नाली बांधकामाचे तसेच सभागृहाचे लोकार्पण आणि भूमिपूजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले.

        भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेनापुर नगरपंचायत कार्यक्षेत्र अंतर्गत भाजपचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 17 कोटी 71 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा रविवारी आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यानंतर झालेल्या जिजामाता सभागृहातील जाहीर कार्यक्रमात बोलताना आ रमेशआप्पा कराड यांनी भाजपाच्या नेतृत्वात रेणापूरचा चौफेर विकास झाला असून गेल्या निवडणुकीत जनतेने टाकलेला विश्वास अभिषेक आकनगिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकास कामाच्या माध्यमातून सार्थक केला असल्याचे बोलून दाखविले. तर आजपर्यंत केलेल्या विविध विकास कामाची माहिती अभिषेक आकनगिरे यांनी आपल्या भाषणातून दिली.

         सम्राट अशोक बौद्ध विहार बांधकामासाठी एक कोटी, नासरजंग कब्रस्तान संरक्षण भिंतीकरिता 25 लक्ष रुपये, संत रोहिदास महाराज मंदिर सभागृह बांधकामासाठी 15 लक्ष मंजूर केल्याबद्दल आणि दहा लक्ष रुपये खर्चाचे श्रीराम मंदिर सभागृह आणि अमृतेश्वर महादेव मंदिर सभागृह, कुडके गल्लीत मातंग समाज सभागृहासाठी बारा लक्ष रुपयाचे समाजमंदिर बांधकाम केल्याबद्दल त्या त्या भागातील नागरिकांच्या वतीने आ रमेशआप्पा कराड यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी दत्ता सरवदे यांनी आभार मानले

            यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे प्रदेशाचे अमोल पाटील लातूर ग्रामीण अध्यक्ष अनिल भिसे तालुका अध्यक्ष दशरथ सरवदे ओबीसी मोर्चाचे मराठवाडा संपर्कप्रमुख बाबासाहेब घुले माजी उपसभापती अनंत चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर वसंत करमुडे महेंद्र गोड भरले सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद दरेकर सुकेश भंडारे श्रीकृष्ण पवार श्रीमंत नागरगोजे रमाकांत फुलारी शीला आचार्य यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

       प्रारंभी सर्व मान्यवरांचा माजी नगरसेवक आणि भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता सरवदे विजय चव्हाण शेख अजीम उज्वल कांबळे श्रीकृष्ण मोटेगावकर अंतराम चव्हाण लखन आवळे महेश गाडे रमा चव्हाण राजू आलापुरे अच्युत कातळे हनुमंत भालेराव गणेश चव्हाण राजू आतार गोविंद राजे रमेश वरवटे उत्तम घोडके लिबराज गायकवाड बालाजी गायकवाड बाबुराव जाधव विशंभर खणगे हनुमंत कातळे विलास खांणगे शिवाजी सलगर नंदकुमार मोटेगावकर सुभाष राठोड धम्मानंद घोडके विशाल कांबळे शफी शेख रफिक शिकलकर सलीम शेख मकसूद शेख गणेश माळेगावकर तुकाराम सातपुते सोपान सातपुते सोमनाथ सातपुते शरद चक्रे मुरलीधर चक्रे गोविंद कुडके महादेव राठोड पिंटू वैष्णव बालाजी वैष्णव सचिन लोकरे रोहित खुमसे, योगेश राठोड नागेश बस्तापुरे खुदूस शेख, जाहीरुद्दीन बावस्कर भानुदास कुडके नरसिंगपूर के पप्पू कुडके प्रल्हाद बंडे सलीम बावचकर यांच्यासह प्रत्येक प्रभागातील सर्व स्तरातील नागरिक भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते



No comments:

Post a Comment