दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
💁♂️ 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षणाचा फैसला लांबणीवर :
92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा फैसला लांबणीवर गेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत, पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसेच, या संदर्भात सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केलं जाणार आहे.
⚡ शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका :
शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मविआ सरकारनं बीएमसीसाठी 236 वॉर्ड केले होते. शिंदे-फडणवीसांनी संख्या कमी करुन 227 वॉर्ड केले होते. शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाला शिवसेनेनं आव्हान दिलं होतं.
🚨 संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला :
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांना 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
⚖️ मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम :
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलेला दिलासा पुन्हा एकदा 16 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला मंदाकिनी खडसे चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहेत. वेळोवेळी त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावलेली आहे, अशी माहिती त्यांचे वकील मोहन टेकवडे यांनी कोर्टाला दिली, याची नोंद घेत हायकोर्टानं मंदाकिनी खडसेंना दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे.
📍 CBSEच्या 10वी-12वीच्या कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्टपासून :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 23 ऑगस्टपासून कंपार्टमेंट परीक्षा घेणार आहे. इयत्ता 10 वी कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीत आणि 12वीची कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटे देण्यात येणार आहेत.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment