📌 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Tuesday, August 30, 2022

📌 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

 📌 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी



(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk 


💰 गौतम अदानी जगातले तिसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत :


अब्जाधीश गौतम अदानी यांनी लुई व्हिटॉनचे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत टॉप 3 मध्ये आपले स्थान निश्चित केले. हा मान मिळवणारे अदानी हे आशिया खंडातील पहिले व्यावसायिक ठरले आहेत. विशेष म्हणजे चीनचे जॅक मा आणि भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सुद्धा आजवर हे करणे शक्य झालेले नाही.


🗣️ 'मेट्रोमुळे राजकीय प्रदूषणही होईल कमी' :


मेट्रो प्रकल्पामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होईलच त्याशिवाय राजकीय प्रदूषणही कमी होणार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई मेट्रो-3 च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भाषणात विरोधकांना टोले लगावले. 


⚖️ बेळगाव सीमाप्रश्नी सुनावणी लांबणीवर :


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आता नोव्हेंबर महिन्यात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी बेळगाव सीमाप्रश्नी  सुनावणी झाली. त्यावेळी कर्नाटकच्या वकिलांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. न्यायमूर्ती जोसेफ यांच्या त्री सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.


⚡ CBIकडून सिसोदियांच्या लॉकरची झाडाझडती :


दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या बँक लॉकरची झाडाझडती सुरू केली आहे. यासाठी सीबीआयचे पथक गाझियाबादच्या पंजाब नॅश्नल बँकेच्या वसुंधरा बँकेत पोहोचले आहे. या ठिकाणी सिसोदिया यांच्यासह त्यांच्या पत्नीही हजर आहेत. 


🚨 अभिनेते कमाल खान यांना अटक : 


चित्रपट अभिनेते व चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान यांना मंगळवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. ही कारवाई 2020 मध्ये एक वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कमाल यांना आज बोरीवली न्यायालयात सादर केले जाईल. कमाल यांना प्रथम मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौकशीअंती त्यांना रितसर अटक करण्यात आली.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून LATURSAPTRANG ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment