माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनंतर लासलगाव विंचूर रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे मजबुतीकरणास सुरुवात - latur saptrang

Breaking

Tuesday, August 30, 2022

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनंतर लासलगाव विंचूर रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे मजबुतीकरणास सुरुवात

 माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनंतर लासलगाव विंचूर रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे मजबुतीकरणास सुरुवात












नाशिक,लासलगाव,दि.३० ऑगस्ट :- लासलगाव विंचूर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला अडथला ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी तसेच दोन्ही बाजूंच्या रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण करण्याच्या सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम  विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



विंचूर लासलगाव रस्त्यावर अनेक वृक्षांच्या फांद्या या भररस्त्यात असल्याने तसेच साईड पट्ट्यांवर गवत व झाड झुडपे अधिक वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण अधिक वाढले होते. याबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दि.२९ ऑगस्ट रोजी लासलगाव येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्यासोबत साईड पट्यांवर वाढलेले गवत, झाडे काढून रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कामाला आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने सुरवात करण्यात आली असून रस्त्यावरील साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण करण्यात येत आहे. यामुळे अपघाताला काही प्रमाणात आळा बसणार आहे.

No comments:

Post a Comment