राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात - latur saptrang

Breaking

Tuesday, August 23, 2022

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात

मुंबई, दि. २३ : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व  एसडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई (कांजूरमार्ग – १, घाटकोपर – १) – २, पालघर – १, रायगड – महाड – २, ठाणे – २, रत्नागिरी -चिपळूण – १, कोल्हापूर – २, सातारा – १, सांगली – २ अशी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १३ पथके तैनात आहेत.

नांदेड – १, गडचिरोली – २ अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) एकूण दोन तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती

राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्हे व ३५२ गावे प्रभावित झाली असून ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे २९६ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १७५३ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५३४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ/23.8.2022



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/tnzFZTH
https://ift.tt/JfVRz8C

No comments:

Post a Comment