दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
⚡ रणकंदन! सत्ताधारी-विरोधक थेट भिडले... :
आज पावसाळी अधिवेशनाला पाचवा दिवस असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ घडला. यावेळी सत्ताधारी-विरोधका आमने-सामने आणि राडा झाला. कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, वाझेचे खोके- मातोश्री ओके, लवासाचे खोके-बारामती ओके, अशा घोषणा सत्ताधारी पक्षाने दिल्या. तर ‘50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ 'गाजर देणे बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा', अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
💁♂️ धक्काबुक्कीवरून अजित पवारांची शिंदे गटावर टीका :
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली.’पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना जिव्हारी लागली असून त्यातून हा प्रकार घडला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
👀 आम्हीच धक्काबुक्की केली, भरत गोगावलेंची कबुली :
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला. यावेळी आमचा जर कोणी नाद केला तर सोडणार नाही. आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करु. मात्र आम्हाला कोणी पाय लावण्याचा प्रयत्न केला, अंगावर आले तर शिंगावर घेऊ. तसेच त्यांनी नव्हे तर आम्हीच त्यांना धक्काबुक्की केल्याची कबुली शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिली.
🗣️ '50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देऊ'
उद्धव ठाकरे प्रमाणेच राज ठाकरेंबद्दलही आदर आहे त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असा पवित्रा शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे जर काही बोलले तर आम्ही जसे काही बोलत नाही. तेवढेच आदरणीय राज ठाकरेंसुद्धा आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून 50 खोके घेतल्यांचा आरोप होत आहे. मात्र, 50 खोके सोडा 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
⚡ नितेश राणे यांचा गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सभागृहात धर्मांतराच्या मुद्द्यावर लक्षवेधी मांडली. राज्यात धर्मांतर करणारं एक मोठं रॅकेट असून, धर्मानुसार आणि जातीनुसार त्यांच रेटकार्ड ठरलेलं आहे असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "आपल्याला पोलीस अधिकाऱ्याला थेट बडतर्फ करायचा अधिकार आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून LATUR SAPTRNG ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment