माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना
मुंबई शहरातील माझगाव येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते सहकुटुंब अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, सौ.मीनाताई भुजबळ, सौ.विशाखा भुजबळ, डॉ.सौ.शेफाली भुजबळ यांच्यासह कुटुंबातील व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment