दिवसभरातील ताज्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Wednesday, August 31, 2022

दिवसभरातील ताज्या घडामोडी




(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk 


💁‍♂️ राज्यात तब्बल 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त! 


राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळा, नगरपरिषद शाळा आणि छावणी शाळांमध्ये मिळून तब्बल 31 हजार 472 पदे रिक्त आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य शाळांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद आणि छावणी शाळा मिळून एकूण मंजूर पदे 2 लाख 45 हजार 591 आहेत. यामध्ये कार्यरत पदे 2 लाख 14 हजार 119 आहेत, तर एकूण रिक्त पदांची संख्या तब्बल 31 हजार 472 आहे. 


🗣️ पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करा - मुख्यमंत्री :


यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. उत्सवाच्या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो की, या प्लास्टिकमुळं होणार प्रदूषण थांबवण्यासाठी आपण निश्चय करुयात आणि सिंगल यूज प्लास्टिकचा दैनंदिन वापर बंद करुयात, असं आवाहन देखील शिंदे यांनी केलं. 


👀 पोहण्यासाठी गेलेल्या भावांचा बुडून मृत्यू :


नाशिकच्या येवला तालुक्यात दुर्दैवी घटना घडली असून भाटगाव शिवारातील अगस्ती नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक दिलीप मिटके आणि तुषार देविदास उगले अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला दोघा युवकांची नावे आहेत.


🔎 आयकर विभागाची युपीत धडक कारवाई


आयकर विभागाने बुधवारी यूपीमध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. आयकर विभागाने एकाच वेळी 22 ठिकाणी छापे टाकले. दिल्लीसह लखनौ आणि कानपूरमध्येही आयकराचे छापे सुरू आहेत. अनेक भ्रष्ट नोकरशहा आणि विविध खात्यांमध्ये काम करणारे अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर आहेत. 


💐 सोव्हिएत नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन :


सोव्हिएत संघाचे माजी राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन झाले आहे. ९१ वर्षीय गोर्बाचेव्ह दीर्घ काळापासून आजारी होते. त्यांनी युद्धाशिवाय शीतयुद्ध थांबवले होते. कोणत्याही रक्तपाताशिवाय त्यांनी शीतयुद्ध संपुष्टात आणले होते. सोव्हिएत संघाचे पतन मात्र ते थांबवू शकले नव्हते. मिखाईल सोव्हिएत संघाचे अखेरचे राष्ट्रपती होते.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment