गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच ५जीची चर्चा सुरू आहे. या ५जी वरून अनेकांच्या मनात अनेक प्रश्न सुद्धा आहेत. ५जी सेवेसाठी त्यांना नवीन सिमकार्ड आणि नवीन स्मार्टफोन खरेदी करावे लागणार की जुन्या फोनमध्ये ही सेवा मिळेल. भारतात लवकरच 5G Service लाँच करण्यात येणार आहे. ऑक्टोबर पर्यंत देशातील प्रमुख शहरात 5G नेटवर्क कनेक्टिविटी मिळू शकेल. स्पेक्ट्रम लिलावानंतर लोकांना 5G सर्विच्या लाँचिंगची उत्सूकता आहे. जिओ ने सुद्धा आपल्या वार्षिक बैठकीत याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दिवाळीपर्यंत ५जी सर्विस मिळू शकते, असे म्हटले आहे. एअरटेलने सुद्धा स्पष्ट केले आहे की, त्यांची सर्विस ऑक्टोबर मध्ये लाँच केली जावू शकते. वोडाफोन आयडियाची ५जी वरून ऑपरेटर्सपेक्षा वेगळा प्लान आहे. कंपनी यूजर्सची गरज पाहून 5G Service लाँच करणार आहे. लाँचिंगआधी अनेकांना जे प्रश्न पडले आहेत. त्याची उत्तरे या ठिकाणी दिली आहेत, सविस्तर जाणून घ्या.
१. 5G काय आहे?
या सर्विसवरून चर्चा करण्याआधी हे जाणून घेणे गरजेचे आहे की, 5G काय आहे. ही टेलिकम्यूनिकेशनचे पुढचे जनरेशन आहे. ज्याला ५ वे जनरेशन किंवा पिढी म्हणून शकता. यात केवळ इंटरनेट स्पीड होत नाही तर ५जी नेटवर्कवर तुम्हाला कॉल आणि कनेक्टिविटी सुद्धा मिळणार आहे.
२. कोणत्या फोनमध्ये चालेल 5G?
जवळपास सर्वच ब्रँड्सने ५जी सपोर्टचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. या सर्विसचा लाभ तुम्हाला एक ४जी स्मार्टफोनमध्ये मिळणार नाही. यासाठी तुम्हाला कमीत कमी ५जी स्मार्टफोन खरेदी करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला बँड्सचा विचार करावा लागेल.
नवीन सिम कार्ड खरेदी करावे लागेल का?
४. नवीन सिम कार्ड खरेदी करावे लागेल का?
नाही, ५जी सर्विससाठी तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करण्याची गरज नाही. तुमच्याकडे सध्याच्या सिम कार्डवर ५जी कनेक्शन सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. कंपन्या नवीन कार्ड खरेदीवर 5G SIM ऑफर करू शकतात.
5G नंतर काय बदल होईल?
टेलिकॉम कंपन्यांनी अजूनपर्यंत ५जी प्लान्सच्या किंमतीचा खुलासा केला नाही. जर तुम्हाला ४जीच्या तुलनेत जास्त पैसे खर्च करावे लागणार की नाही, यासंबंधीची अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.
६. काय बदल होईल?
५जी नेटवर्क आल्यानंतर एका दिवसात काही बदल होणार नाही. परंतु, तुम्हाला जबरदस्त कॉल आणि कनेक्टिविटी मिळू शकते. याशिवाय, इंटरनेट स्पीड एका दिवसात जरूर बदलेल. ज्या ठिकाणी तुम्हाला 4G वर 100Mbps ची स्पीड मिळत असेल तर ५जी आल्यानंतर तुम्हाला आरामात 1Gbps ची स्पीड मिळेल.
Wi-Fi ची गरज संपणार?
७. वाय फायची गरज संपणार?
असे आजिबाद होणार नाही. ५जी आल्यानतर तुम्हाला वाय फाय ची गरज पडणार नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. याचा काही परिणाम वाय फाय मार्केटवर जरूर पडू शकतो. परंतु, ते पूर्णपणे बंद पडणार नाही.
८. भारतात सर्वांना मिळेल ५जी सर्विस?
सुरुवातीला टेलिकॉम कंपन्या मेट्रो शहरात या सर्विसला लाँच करणार आहे. हळू हळू याचा विस्तार केला जाईल. जिओने आपल्या वार्षिक बैठकीत सांगितले की, डिसेंबर २०२३ पर्यंत आपल्या ५जी सर्विसचा विस्तार संपूर्ण देशात केला जाईल.
4G सर्विस संपणार?
९. ४जी सर्विस संपणार?
अनेक लोकांना वाटते की, ५जी आपल्यानंतर ४जी सर्विस संपेल. परंतु, असे होणार नाही. तुम्हाला दोन्ही सर्विस सोबत मिळू शकतील. जसे आता ४जी आणि ३जी सर्विस मिळते.
१०. ५जीमुळे नवीन जगाचा रस्ता उघडणार?
इंटरनेटच्या नवीन जनरेशन आल्यानंतर जवळपास अनेक बदल होती. इंटरनेटचा तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल. वाय फाय कॅमेरा पासून स्मार्ट स्पीकर पर्यंत वेगाने विस्तार होण्याची शक्यता आहे. परंतु, हे सर्व एकाच दिवसात होणार नाही. याशिवाय, मेटावर्स सारख्या वस्तूंचे चलन वाढेल. मेटावर्स आपल्यासाठी नवीन जग असेल. जे व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये जगाचा एक्सपीरियन्स देईल.
No comments:
Post a Comment