पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - latur saptrang

Breaking

Wednesday, August 31, 2022

पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईदि. 31 :- मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाशेजारी असलेल्या ‘तोरणा’ बंगल्याचे नूतनीकरण करताना सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी -सुविधांची निर्मिती करावीअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. डावखर यांच्यासह तोरणा बंगल्याची पाहणी केली.

‘वर्षा’ आणि ‘तोरणा’ या शासकीय निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष पुरवले असून  या पोलीस – अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास कक्षदुमजली बेड (बंक बेड)वातानुकूलित यंत्रेध्यानधारणेसाठी कक्ष अशा सुविधांचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. पिण्याचे पाणीस्वच्छतागृहे आणि इतर सुविधा लवकरात लवकर पुरविण्याचे निर्देश देतानाच हे काम रेंगाळणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

 

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Hs298kw
https://ift.tt/k45QAzT

No comments:

Post a Comment