व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात 100 रुपयांनी कपात, घरगुती ग्राहकांसाठी दर काय ?
दिल्लीत आजपासून 19 किलोच्या LPG गॅस सिलेंडरचा आता 1976.50 हून 1885 रुपये होणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी गॅसचे दर 1995.50 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. याआधी हा दर 2095 रुपये इतका होता. मुंबईत एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1844 रुपये इतकी झाली आहे.
दर कपात किती?
व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात दिल्लीत 91.50 रुपये, कोलकातामध्ये 100 रुपये, मुंबईत 92.50 रुपये आणि चेन्नईत 96 रुपयांनी स्वस्त झाला आहे. या दर कपातीचा फायदा रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक कारणांसाठी एलपीजी गॅस वापरणाऱ्यांना होणार आहे.
घरगुती एलपीजी गॅसच्या दरात कोणताच बदल नाही
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही. घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात 6 जुलैपासून कोणताही बदल झाला नाही. जुलै महिन्यात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मुंबईत घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रुपये, कोलकातामध्ये 1079 रुपये आणि चेन्नईत 1068.50 रुपये मोजावे लागत आहेत.
व्यावसायिक एलीपीजी ग्राहकांना दिलासा
गॅस कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅसचे दर जाहीर केले जातात. काही वेळेस महिन्याच्या मध्यावरदेखील नवीन दर जाहीर होतात. ऑगस्ट महिन्यातदेखील व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात 36 रुपयांची कपात झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा 50 रुपयांनी दर कपात करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment