दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
🤩 महाराष्ट्र पोलिसांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट :
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं महाराष्ट्र पोलिसांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गतच 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवता येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. याआधी ठाकरे सरकारनं ही योजना बंद केली होती. फडणवीसांनी मात्र ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील पोलीस दलासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
💰 जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात GST घटला :
जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यातील जीएसटी कर संकलनात घट झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये जीएसटी संकलन 1 लाख 43 हजार 612 कोटी रुपये इतकं करण्यात आले. जुलै महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख 48 हजार 995 कोटी रुपये इतके होते. सध्याच्या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलन अधिक होते. एप्रिल महिन्यात 1 लाख 67 हजार 540 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले होते. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
👀 मुख्यमंत्री गणरायाच्या दर्शनासाठी 'शिवतीर्थ'वर :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी साडे चार वाजता एकनाथ शिंदे गणपती दर्शनाच्या निमित्तानं राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. ही भेट फक्त गणपती दर्शनापुरती मर्यादीत असेल की, त्यात नवी राजकीय समीकरण दडली आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
💁♂️ दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप :
आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप देण्यात येणार आहे. साधारणपणे सायंकाळी चार वाजल्यानंतर गणपती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात होईल. कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहाने पार पडत आहे. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. त्याशिवाय, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्थांनीदेखील कृत्रिम तलावाद्वारे विसर्जनाची तयारी केली आहे.
💸 एनआयकडून दाऊदवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर :
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांवर बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएने दाऊद आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांविरोधात याआधीच गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर एनआयएने दाऊद आणि त्याच्या टोळीतील इतर गँगस्टरविरोधात बक्षीस जाहीर केले आहे. दाऊद विरोधात 25 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment